Lajpat Nagar Blast Case “आयुूष्य नव्याने उभारण्यात व्यस्त झाले, न्याय मागायला कुणाला वेळ होता”? लाजपत नगर स्फोटात पती गमावलेल्या महिलेची वेदना
नवी दिल्लीमधल्या लाजपत नगर येथे ३० वर्षांपुर्वी झालेला बाँबस्फोट आजही पिडीतांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तितकाच वेदनादायी आहे. २१ मे १९९६ रोजी, संध्याकाळी साधारण साडेपाचच्या सुमारास, पिंकी सूद आपल्या १२ वर्षांच्या मुलीला आणि आठ वर्षांच्या मुलाला गुंतवून ठेवत, रात्रीच्या जेवणाची तयारी करत घरी आपल्या कामात व्यस्त होत्या, तेव्हा एका नातेवाईकाच्या फोनने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
दिल्लीच्या लजपत नगर मार्केटमध्ये एक स्फोट झाला होता, जिथे त्यांचे पती राकेश कुमार सूद यांचे फ्रेमिंगचे दुकान होते. “पिंकी, तुम्ही जाऊन बघा,” एवढेच तो नातेवाईक त्यांना म्हणाला. त्यावेळी त्या ३० वर्षांच्या होत्या.
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार पिंकी सूद म्हणाल्या मी बाजाराकडे धाव घेतली. सगळीकडे धूर, आग आणि गोंधळ होता. आमचं संपूर्ण दुकान जळून खाक झालं होतं हे मला दिसत होतं, पण सूद साहेब कुठे होते याची मला काहीच कल्पना नव्हती,” असं आता ६० वर्षांच्या असलेल्या पिंकी, आपल्या अमर कॉलनीतील घरात बसून म्हणाल्या.
कारचा स्फोट
त्या स्फोटाला ३० वर्षे झाली आहेत, ज्यात १३ जण ठार आणि ३९ जण जखमी झाले होते. एचटीला मिळालेल्या पोलीस आणि न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, लाजपत नगर सेंट्रल मार्केटमधील एका उद्यानाजवळ सायंकाळी ६:३० च्या सुमारास आरडीएक्सने भरलेल्या मारुती कारचा स्फोट झाला.
स्फोटानंतर काही तासांनी, जम्मू काश्मीर इस्लामिक फ्रंट (जेकेआयएफ) या दहशतवादी संघटनेने राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, असे पोलिसांनी सांगितले.
वाजपेयी सरकार नुकतंच स्थापन
अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून आपला १३ दिवसांचा पहिला कार्यकाळ सुरू केल्यानंतर पाच दिवसांनी हा स्फोट झाला होता . त्याच्या दुसऱ्या दिवशी, राजस्थानच्या दौसा येथे बसमध्ये झालेल्या आणखी एका स्फोटात १४ जण ठार झाले, ज्याची जबाबदारीही जेकेआयएफनेच स्वीकारली होती .
पिंकी यांच्यासाठी पुढची रात्र जागून काढावी लागणार होती, कारण त्या आपल्या पतीच्या शोधात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात आणि पुन्हा बाजारात धावपळ करत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ११ वाजता पिंकी यांना सांगण्यात आले की त्यांच्या पतीचे निधन झाले आहे.

न्यायालयात कधीच गेले नाही
या ३० वर्षांत, स्फोटाचा खटला सुरू असताना पिंकी यांनी एकदाही न्यायालयाच्या आवारात पाऊल ठेवले नाही – आणि त्यांना त्याचे काहीही वाईट वाटत नाही. त्या म्हणतात “मी अचानक कुटुंबाची प्रमुख बनले होते, माझ्या मुलांसाठी आई आणि वडील दोघांचीही भूमिका बजावत होते, आणि मला त्याचा व्यवसायही सांभाळावा लागत होता.
न्याय मिळवण्यासाठी कोणाला वेळ होता? जे घडले होते, त्याच्याशी मला जुळवून घ्यावे लागले… या वेदनादायक आठवणी आहेत आणि मला माझे आयुष्य पुन्हा नव्याने उभारायचे होते,” असे पिंकी म्हणाल्या.
आयुष्य नव्याने उभं करायचं होतं
त्या आर्थिक मदतीपलीकडे, आयुष्य पुन्हा उभारण्याची जबाबदारी पूर्णपणे पीडितांवरच होती. “घटनेनंतर दोन-तीन महिन्यांनी मी व्यवसाय सांभाळायला घेतला, कारण मला माझ्या मुलांना पोसायचे होते… पहिली पायरी म्हणजे दुकानाची दुरुस्ती करणे, ज्याला सुमारे दोन महिने लागले. सूद साहेबांच्या मृत्यूनंतरच्या या अनोळखी जगात मार्ग काढायला कर्मचाऱ्यांनीच मला मदत केली,” असे त्या म्हणाल्या.
Comments are closed.