फिलिपाइन्समध्ये विमान अपघात, हवाई दलाच्या दोन विमानांची टक्कर; 4 चा मृत्यू
डेस्क: फिलिपाइन्सच्या हवाई दलाची दोन विमाने एकमेकांना धडकली. बटांगस प्रांतातील फर्नांडो एअर बेस येथे प्रशिक्षणादरम्यान दोन SF-260 विमानांमध्ये हा हवाई अपघात झाला, ज्यामध्ये 4 वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही विमाने हवेतच आदळली. विमाने हवाई तळाच्या आवारात कोसळली, परंतु याशिवाय इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही.
फिलिपिन्स हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या कारणाचा तपास पूर्ण होईपर्यंत हवाई दलाने त्यांचे सर्व SF-260 ट्रेनर विमान तात्पुरते ग्राउंड केले आहेत. या वर्षी मे महिन्यात उत्तर फिलिपाइन्समधील डोंगराळ भागात एसएफ-२६० ट्रेनर विमान कोसळून दोन पायलट ठार झाले होते.
Comments are closed.