लँडिंगदरम्यान विमानाची पोलीस हेलिकॉप्टरला धडक, वैमानिकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लँडिंगदरम्यान विमान पोलीस हेलिकॉप्टरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला. सुदैवाने हेलिकॉप्टरमधील दोन्ही पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले. अमेरिकेतील फिलाडेल्फियापासून वायव्येस सुमारे 170 किमी अंतरावर असलेल्या कार्लिस्ले येथील लहान विमानतळावर ही दुर्घटना घडली.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कार्लिस्ले येथील लहान विमानतळावर बेल 407 हेलिकॉप्टर आणि सेसना 150 विमानात हा अपघात झाला. हे विमान धावपट्टीवर उतरत असताना जमिनीलगत असलेल्या पेनसिल्व्हेनिया राज्य पोलिसांच्या हेलिकॉप्टरवर जाऊन आदळले. यात विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू झाला. सेसना हे दोन आसनी विमान असून त्याचा वापर सामान्यतः प्रशिक्षण विमान म्हणून केला जातो.

हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिक आत अडकले होते; त्यापैकी एकाने खिडकी बाहेर ढकलून उघडली आणि दुसऱ्याला त्या खिडकीतून बाहेर काढण्यास मदत केली, असे बिव्हन्स यांनी सांगितले. हे हेलिकॉप्टर प्रशिक्षणाचे काम करत होते.

Comments are closed.