फ्लोरिडाच्या रस्त्यावर विमान उतरवले

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील हायवेवर मंगळवारी एका विमानाने इमर्जन्सी लँडिंग केले. रात्रीच्या अंधारात लँड करताना हे विमान एका कारला धडकले खरे, पण त्यात कसलीही जीवितहानी झाली नाही. क्षणातच सावरलेले हे विमान सहज रस्त्यावर उतरले. विमानातील वैमानिकांना कसलीही दुखापत झाली नाही. उच्च दर्जाचे आणि गुळगुळीत रस्ते नसते तर हे शक्यच झाले नसते. या घटनेनंतर सोशल मीडियात आता हिंदुस्थानातील रस्त्यांची ‘महती’ गायली जात आहे.

Comments are closed.