वयाच्या 62 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 10 क्रमांकावर फलंदाजीला आले

वयाच्या 62 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणः आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 पेक्षा जास्त वय असलेले फार कमी खेळाडू आहेत. चाळीशीच्या आसपास आलेले असताना अनेक खेळाडू क्रिकेटमधून संन्यास घेतात. जगभरात अनेक लीग खेळवण्यात येतात. यामध्ये चाळीशी ओलांडलेले अनेक खेळाडू खेळतात. मात्र, त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. या दरम्यान, एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास (debut in international cricket at the age of 62) रचलाय. वयाच्या 62 व्या वर्षी त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.

ओसमान गोकरचा रेकॉर्ड मोडित, त्यांनी केलं होतं 59 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

फॉकलँड  आयलँड आणि कोस्टा रिका दरम्यान खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात या खेळाडूने पदार्पण केलंय. मीडिया रिपोर्ट्नुसार सामना 10 मार्च रोजी खेळवण्यात आला होता. हा फॉकलँड  आयलँड चा पहिला सामना होता. या सामन्यात अँड्र्यू ब्राऊनली यांनी वयाच्या 62 वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. ते सर्वात जास्त वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी खेळाडू ठरले आहेत. त्यांनी ओसमान गोकरचा रेकॉर्ड मोडलाय. ओसमान गोकरने 2019 मध्ये वयाच्या 59 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

वयाची 60 वर्षे उलटल्यानंतर पदार्पण करणारा पहिला खेळाडू

वयाची 60 वर्षे उलटल्यानंतर पदार्पण करणारे ब्राऊनली पहिले खेळाडू ठरले आहेत. अँड्र्यू ब्राऊनली यावेळी तीन टी 20 सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात 10 क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ब्राऊनली यांनी पहिल्या सामन्यात 1 तर दुसर्‍या सामन्यात 2 आणि तिसर्‍या सामन्यात 3 धावा केल्या आहेत. याशिवाय त्यांनी गोलंदाजीही केली मात्र, त्यांना विकेट पटकावण्यात यश आलं नाही.

पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना

दरम्यान, पदार्पण केल्यानंतर पहिल्या सामन्यात त्यांना यश आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या करिअरची सुरुवात म्हणावी इतकी चांगली झाली नाही. फॉकलँडचा संघा या मालिकेत केवळ एकच सामना जिंकू शकलाय. पहिल्याच सामन्यात त्यांना 66 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. 5 सामन्यांमध्ये कोस्टा रिकाने बाजी मारली आणि केवळ एकच सामना फॉकलँडने जिंकला. मात्र, या सामन्यात ब्राऊनली संघाचा भाग नव्हते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास

अधिक पाहा..

Comments are closed.