पीएम किसान फंड उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे
पंतप्रधान 21 वा हप्ता तामिळनाडूमधून जारी करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये हस्तांतरित करतील. या घोषणेमुळे देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे होणाऱ्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी जवळपास 18,000 कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करतील. यापूर्वी ऑगस्टमध्ये 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारतर्फे प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये वर्षाला एकूण 6 हजार रुपये हस्तांतरित केले जातात.
पीएम किसान निधीचा हप्ता प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारच्या पडताळणीत पात्रता निकष पूर्ण न करताही 31 लाखांहून अधिक लाभार्थी शेतकरी पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असल्याचे आढळून आले होते. आता त्यांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात. तसेच अद्याप आपले ‘किसान ओळखपत्र’ (फार्मर आयडी) न घेतलेल्या शेतकऱ्यांनाही अडचणी येऊ शकतात.
Comments are closed.