पंतप्रधान किसन हप्ता आज शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल
पंतप्रधान मोदी बिहारमधून निधी जारी करणार
वृत्तसंस्था/ भागलपूर
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याचे 2,000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जारी करतील. बिहारमधील भागलपूर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. यापूर्वी पंतप्रधानांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून 18 वा हप्ता जारी केला होता. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात.
Comments are closed.