'पीएम किसान'चा हप्ता 30 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे

दिवाळीपूर्वी 24 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणार असून 30 ऑक्टोबर रोजी लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जातील. यासंबंधीची अधिकृत तारीख पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडलवर शुक्रवारी जाहीर करण्यात आली. कृषी मंत्रालयानेही 24 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करून या माहितीला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.

‘तारीख लक्षात घ्या! पीएम-किसानचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर 2026 रोजी वितरित केला जाईल. या सेवेमुळे आपल्या अन्नदात्यांना आर्थिक सहाय्य मिळेल आणि ते सक्षम होतील.’ असा संदेश पीएम किसान योजनेच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. या योजनेतील दोन हजार रुपयांची रक्कम प्राप्त करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई-केवायसी संबंधी खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचे पैसे अडकून राहू शकतात.

Comments are closed.