पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान वाचा
कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मुबारक अल-कबीर हा पुरस्कार प्रदान केला.
कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
भारत आणि कुवेत यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीसाठी, कुवेतमधील भारतीय समुदायाला आणि भारतातील १.४ अब्ज लोकांना पंतप्रधानांनी हा पुरस्कार समर्पित केला.
कुवेतचे महामहिम अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांनी मुबारक अल-कबीर ऑर्डर बहाल केल्याचा मला सन्मान वाटतो. मी हा सन्मान भारताच्या लोकांना आणि भारत आणि कुवेत यांच्यातील दृढ मैत्रीला समर्पित करतो. pic.twitter.com/fRuWIt34Cx
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 22 डिसेंबर 2024
43 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांच्या कुवेतच्या या ऐतिहासिक दौऱ्यावर हा पुरस्कार मिळाल्याने या सोहळ्याला विशेष अर्थ प्राप्त झाला.
हा पुरस्कार 1974 मध्ये स्थापित करण्यात आला आणि तेव्हापासून निवडक जागतिक नेत्यांना प्रदान करण्यात आला.
Comments are closed.