“क्रीडाक्षेत्राचा विकासात मोलाचा वाटा”, लाल किल्ल्यावरून PM मोदींचा महत्त्वपूर्ण संदेश

79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर सलग 12व्यांदा तिरंगा फडकावला आणि राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी भाषणात सांगितले की आता पालकांची क्रीडेकडे पाहण्याची मानसिकता बदलत आहे. पूर्वी मुलांना खेळांपासून दूर ठेवणारे पालक आता त्यांच्या क्रीडा यशावर अभिमान बाळगतात. हे सकारात्मक संकेत असल्याचे ते म्हणाले आणि हा बदल पाहून त्यांना आनंद होत असल्याचे सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले की देशाच्या दुर्गम भागात क्रीडेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी नॅशनल स्पोर्टस् पॉलिसी मोठा हातभार लावेल. त्यांनी आवाहन केले की सरकारी धोरणांमध्ये बदलाची आवश्यकता असल्यास लोकांनी त्यांना कळवावे. पुढे बोलताना त्यांनी 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या आपल्या ध्येयावर युवाशक्तीच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. विविधतेचा उत्सव साजरा करण्याची सवय लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भाषांच्या समृद्ध वैविध्याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की भारतातील सर्व भाषांवर आपल्याला अभिमान असला पाहिजे. Operation Sindoor चा उल्लेख करताना त्यांनी आपल्या शूर जवानांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन पराभूत केले असे सांगितले. पहलगाममध्ये धर्म विचारून केलेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना शिक्षा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments are closed.