डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले; हिंदुस्थान-अमेरिका संबंधांना नवे वळण, सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता…

जगाला टॅरिफचा दणका देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता अमेरिकेतच विरोधाला सामोरे जावे लागत आहे. रशियाकडून तेल खरेदीचे कारण देत अमेरिकेने हिंदुस्थानवर अतिरिक्त 25 टक्के करत लादत एकून 50 टक्के करत लावला. त्यामुळे हिंदुस्थानने रशिया आणि चीनसोबत मैत्री वाढवली. त्यामुळे आणि अमेरिकेतील वाढता दबाव यांचा परिणाम ट्रम्प यांच्यावर दिसत असून आता ते नरमले आहेत.

हिंदुस्थानवर लादलेल्या टॅरिफचे समर्थन करत ट्रम्प यांनी हिंदुस्थानविरोधात वक्तव्य केले होते. तसेच टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकी देत पुन्हा एकदा हिंदुस्थानवर दबाव वाढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर 12 तासांतच त्यांना उपरती झाली असून आता ते बॅकफूटवर गेले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, हिंदुस्थानशी संबंध सुधारण्यास मी नेहमीच तयार आहे.चीनमुळे आपण हिंदुस्थान आणि रशियाला गमावलं आहे. हिंदुस्थान आणि अमेरिका यांचे संबंध दृढ असून असे काही मतभेद राजनैतिक आणि जागतिक वातावरणात घडत असतात. त्याचा या दोन्ही देशांचा संबंधांवर परिणाम होणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

आपण, अमोरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांबद्दलच्या त्यांच्या विचारांचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक आणि दूरदर्शी धोरणात्मक भागीदारी आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ट्रम्प यांचे बदलेले धोरण, त्यांनी बॅकफूटवर जात घेतलेली नरमाईची भूमिका आणि हिंदुस्थानने त्यांना दिलेला प्रतिसाद याचा सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Comments are closed.