दहशतवादाला थारा नाही; ‘मन की बात’मध्ये मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा केला उल्लेख – TMarathiNews

नवी दिल्ली | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या 138 व्या भागात 2016 मधील सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा दिला. 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या कारवाईला दहा वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

मोदी यांनी सांगितले की, नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय जवानांनी केलेली ही कारवाई भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील महत्त्वाची घटना ठरली. सर्जिकल स्ट्राईक ही दहशतवादी हल्ल्यांमुळे भारताने दीर्घकाळ सहन केलेल्या वेदनेला दिलेली निर्णायक प्रतिक्रिया होती, असे त्यांनी म्हटले.

बालाकोट एअर स्ट्राईकपासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंत भारताने दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याचा संदेश दिल्याचेही मोदी यांनी नमूद केले. भारत आता दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ घेऊन पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मोदी यांनी 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील साखळी बॉम्बस्फोट आणि त्यानंतर झालेल्या 26\11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला. दहशतवादाविरोधातील भारताच्या बदललेल्या धोरणाचा संदर्भ देताना त्यांनी गेल्या दशकातील विविध कारवायांचा उल्लेख केला.

Comments are closed.