Pm narendra modi wishes maharashtra day in marathi
आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
PM Modi On Maharashtra Din : नवी दिल्ली : 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. त्यामुळे आजच्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, देशाचे पंतप्रधान आज मुंबई दौऱ्यावर असून X वर पोस्ट करत त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी या शुभेच्छा मराठीत देण्यात आल्या आहेत. भारताच्या विकासात महाराष्ट्र कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. (pm narendra modi wishes maharashtra day in marathi)
भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी…
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2025
पंतप्रधानांच्या पोस्टमध्ये काय?
भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – Uddhav Thackeray : दिल्लीच्या नादाला लागून… काय म्हणाले उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्याही शुभेच्छा
महाराष्ट्रातील तमाम बंधू-भगिनींना आणि देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र दिन हा यासाठी महत्त्वाचा आहे की, भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र भारताच्या विकासामध्ये निरंतर महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या महाराष्ट्राला असंच पुढे घेऊन जाण्याचा आमचा संकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Uddhav Thackeray : तो कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे काय, महाराष्ट्र दिनी ठाकरेंचा सवाल
Comments are closed.