शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीक विमा भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस, कशी कराल नोंदणी?

पीक विमा: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. , शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पीक विम्याची नोंदणी कशी करावी? याबाबातची सविस्तर माहिती पाहुयात.

पिकांचा विमा काढण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत

शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार पीएम पीक विमा योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांकडे नोंदणीसाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नोंदणीसाठी पोर्टल लिंक आणि हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

तातडीने अर्ज करण्याचे आवाहन

केंद्र सरकारने पीएम पीक विमा योजनेंतर्गत पीक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 ही अंतिम तारीख निश्चित केली होती. परंतु, शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे आणि मोठ्या संख्येने शेतकरी अर्ज करू शकत नसल्यामुळे केंद्र आणि काही राज्यांनी नोंदणीची तारीख 15 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रब्बी हंगामात अधिक अर्ज अपेक्षित

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत, कमी प्रीमियम भरून शेतकरी स्वेच्छेने त्यांच्या पिकांचा विमा काढू शकतात. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही आणि नुकसान भरपाईसाठी विम्याची रक्कम मिळेल. सरकारी आकडेवारीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरीप हंगामात 9 कोटींहून अधिक अर्ज आले होते, आता रब्बी हंगामातही तितकीच नोंदणी अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी

शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे की ते पीएम पीक विमा योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी किसान कृषी रक्षक पोर्टल (KRPH) ला भेट देऊ शकतात.
शेतकरी हेल्पलाइन क्रमांक 14447 वर कॉल करू शकतात.
7065514447 या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर मेसेज पाठवून शेतकरी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. पीक विमा अर्ज डाउनलोड करून शेतकरी सर्व माहिती मिळवू शकतात.
या हेल्पलाइन्सच्या माध्यमातून शेतकरी नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे आणि इतर माहिती आणि विम्याची प्रक्रिया समजू शकतात.
पीक विम्याची नोंदणी कशी करावी
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंदणी करण्याचे 3 सोपे मार्ग सांगण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की केसीसी कार्डधारकांनी त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन आजच नोंदणी करावी आणि पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. इच्छुक शेतकरी अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/ ला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी देखील करू शकतात. तर रब्बी पीक विम्याची नोंदणी करण्यासाठी, शेतकरी https://pmfby.gov.in/farmerRegistrationForm वर क्लिक करु शकतात.

अधिक पाहा..

Comments are closed.