खापा वनक्षेत्रात पट्टेदार वाघाची शिकार

नागपूर जिह्यातील खापा वनपरिक्षेत्रात धक्कादायक घटना घडली आहे. कोरमेटा क्षेत्रातील सिरोंजी हद्दीतील भनगाळा नाला येथे एका पट्टेदार वाघाची शिकार करण्यात आली. शिकाऱयांनी 11 केव्ही वीज वाहिनीवरून लोखंडी तार आणि बांबू वापरून सापळा रचला होता. शुक्रवारी दुपारी वनखात्याला वाघासदृश प्राणी पडल्याची माहिती मिळाली.
नागलवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत तीन ते साडेतीन वर्षांचा नर वाघ मृत आढळला. शिकाऱयांनी वाघाच्या मिशा, दात आणि चारही पंजे कापून नेले. या प्रकरणाचा तपास सहायक वनसंरक्षक व्ही.सी. गंगावणे आणि खापा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. आठवले करत आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातील श्वान पथकाची मदत घेण्यात आली आहे.
n चंद्रपूरमधील वाघ शिकारीचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडली आहे. यवतमाळ जिह्यातील टिपेश्वर अभयारण्यात एक बछडा आणि पीसी वाघीण फासात अडकले होते. पर्यटकांच्या जागरुकतेमुळे त्यांची सुटका झाली. 2016 पासून अनेक प्रसिद्ध वाघ बेपत्ता आहेत. त्यांच्याबाबत वनविभागाकडे स्पष्टीकरण नाही. या नव्या घटनेमुळे वनखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Comments are closed.