फटाके फोडणाऱ्यांना कारवाईचे ‘फटके’ मिळणार, पोलीस कारवाई करणार
फटाक्यांमुळे प्रदूषणाचा प्रश्न फारच गंभीर बनला आहे. आवाज व धुरामुळे वातावरणाची अक्षरशः वाट लागल्याने याची गंभीर दखल सर्वच स्तरातून घेण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमी पोलिसांनीदेखील फटाके फोडणाऱयांना आपल्या रडारवर आणले आहे. फटाके फोडून ध्वनी व वायुप्रदूषण करताना सापडेल अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
फटाक्यांबाबत न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली आहे, परंतु तरीही नागरिक फटाके फोडत आहेत. याचा नागरिकांसह प्राण्यांनादेखील फटका पडत आहे. प्रचंड वायू व ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. म्हणूनच आज प्रशासनानेदेखील फटाके वाजविण्यावर कठोर भूमिका घेतली आहे. फटाक्यांच्या त्रासाला कंटाळून नागरिक पोलिसांनादेखील संपर्क साधून तक्रार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर फटाके फोडून प्रदूषण करताना सापडणाऱयांवर कारवाई करा, असे आदेशच वरिष्ठ अधिकाऱयांकडून देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
Comments are closed.