हगवणेंच्या प्रकरणात पोलिसांची कारवाई; चारचाकी गाड्या, चांदीची भांडी जप्त; 51 तोळं सोन्याबाबतही

वैष्णवी हागावणे: वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी फरार झाल्यानंतर राजेंद्र हगवणे यांनी वापरलेल्या चार चाकी वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे यांनी वापरलेली बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे. 17 मे ला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हा फरार झाला होता. त्यादरम्यान याच बोलेनो वाहनातून त्याने अनेक ठिकाणी प्रवास केला होते. बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहेत. आणखी किती वाहने आरोपी राजेंद्र हगवणे हा फरार असताना त्यांनी वापरली याचा तपास बावधन पोलीस घेत आहेत.

51 तोळं सोन्याबाबतही पोलिसांनी दिली मोठी माहिती

याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, हगवणे प्रकरणात आत्तापर्यत गुन्हा दाखल झाल्यापासून हुड्यांंत दिलेली अँक्टीव्हा, फॉर्च्यूनर आणि चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहे. हगवणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळूनजाण्यासाठी वापरलेली जी वाहने आहेत, ती जप्त करण्यात आली आहेत. इंडिवर आणि बलेनो वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. आणखी काही वाहनांची माहिती मिळते का ? त्याचा देखील तपास सुरू आहे, कस्पटेंनी दिलेलं 51 तोळं सोनं हे बॅंकेत ठेवून त्यावरती कर्ज घेतलेलं आहे. त्याबाबतीत बॅंकेशी पत्रव्यवहार झाला आहे, त्याची माहिती देखील लवकरच मिळेल. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शासन केलं जाईल, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

चांदीची भांडी अन् इंडिवर गाडी देखील जप्त केली

आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन इंडिवर गाडी ही देखील जप्त करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आधी थार गाडी जप्त केली होती. काल(शनिवारी) फोर्ड कंपनीची इंडिवर गाडी जप्त केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. कस्पटे कुटुंबीयांनी स्त्रीधन म्हणून वैष्णवीला दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आली आहेत. कस्पटे कुटुंबीयांनी स्त्रीधन म्हणून वैष्णवी हीच दिलेली चांदीची भांडी (पाच ताटे ,पाच तांबे ,चार वाट्या, एक करंडा, एक अधिक महिन्यात दिलेले चांदीचे ताट) पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त करण्यात आले.

दोन्ही शस्त्र जप्त करण्यात आले

दरम्यान,राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर काही दिवस फरार झाले होते. आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडे परवाना शस्त्र असल्याने ते दोन्ही शस्त्र जप्त करण्यात आले, त्यामध्ये एक पिस्टल व एक वेबले कंपनीचे रिवॉल्वर आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार जी कारवाई असेल ती केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी कस्पटे यांच्याशी चर्चा करताना म्हटलं. याशिवाय विविध लोकप्रतिनिधींनी वैष्णवी कस्पटे हिच्या आई-वडिलांची भेट घेतली.

अधिक पाहा..

Comments are closed.