सिंधुदुर्गात घरफोडी करणाऱ्याला पोलिसांकडून अटक, पाऊणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गात घरफोडी करणाऱ्याला सराईत चोरी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. या चोराकडे पाऊणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाम पोलिसांनी जप्त केला आहे.

कणकवली तालुक्यातील कलमठ येथे एका सराईत चोराने घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल चोरला होता. या प्रकरणी संजय सुभाष यांनी दिलेल्या फिर्याद दिली होती. पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवली आणि मोठ्या शिताफीने सचिन राजु माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी याला कर्नाटकातून अटक केली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Comments are closed.