वरळी सी-लिंकवर भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू

वरळी सी लिंकवर (दि.9) एक भीषण अपघात झाला असून, या अपघातामध्ये पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. वरळी सी लिंकच्या आणि सागरी किनारा मार्ग या दरम्यान असलेल्या कनेक्टिंग पाॅईंटजवळ हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार व्हीआयपी बंदोबस्तासाठी काही पोलीस तैनात होते. यावेळीच हा अपघात झाला. रस्त्यावरून भरधाव वेगाने जात असलेल्या एका कारने हवालदाराला उडवले. या अपघातामध्ये हवालदाराचा जागीच मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या हवालदाराचे नाव दत्तात्रय कुंभार असे आहे. वरळी पोलीस ठाण्यामध्ये ते कार्यरत होते. भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरुन त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु रुग्णालयामध्ये पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. संबंधित कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर पुढील कारवाई आता सुरु करण्यात आली आहे.

Comments are closed.