पोलीस खात्याला मिळणार ‘एआय रोबोट’ची मदत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एआय रोबोट आता अनेक क्षेत्रासाठी नवे राहिले नाही. देश-विदेशातील आघाडीच्या कंपन्या सर्रासपणे एआय रोबोटच्या मदतीने अशक्य कामे सहज करताना दिसत आहे. आगामी पाच वर्षांत जगातील अनेक देशांतील पोलीस विभागामध्येही एआय रोबोट पोलिसांची कामे करताना दिसेल, असे एका नव्या अभ्यासात म्हटले आहे. पोलीस जी बेसिक पेट्रोलिंगची कामे करतात. त्यासाठी एआय रोबोटची मदत घेतली जाईल आणि गुन्हेगारी रोखण्यात एआय रोबोट महत्त्वाची भूमिका बजावतील, असे या अभ्यासात म्हटले आहे.

अॅडवॉन्स्ड रोबोटिक सिस्टम पोलीस अधिकाऱयाप्रमाणे गुन्हेगारी रोखणे, संशयित आरोपीला ट्रक करणे आणि एखाद्या मिशनवर पोलिसांसोबत एआय रोबोट मदत करताना दिसेल. रोबोटिक अधिकारी लवकरच बॉम्ब डिस्पोजल रोलमध्येही डिसेल, असे युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेयरचे प्राध्यापक इवान सन यांनी एरिजोनामध्ये अमेरिकन एसोसिएशन फॉर द अॅडवॉन्स्ड ऑफ सायन्स काॅन्फ्रेन्समध्ये बोलताना सांगितले. एआय रोबोटवर गोळीबार झाल्यास किंवा कोणी चाकूने भोसकल्यास रोबोटला काहीच होऊ शकणार नाही. तसेच दम न लागता दूरपर्यंत संशयित आरोपीच्या मागे रोबोट बिनधास्त धावू शकेल. आणखी एका रिसर्चच्या माहितीनुसार, जगभरातील पोलिस डिपार्टमेंट आपल्या ऑपरेशनचा विस्तार करण्यासाठी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहे, असे म्हटले आहे.

Comments are closed.