एक्स्प्रेस पकडताना पडल्याने पोलीस अंमलदाराचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसमध्ये इंद्रायणी एक्स्प्रेस पकडताना तोल जाऊन पडल्याने फलाट व पटरीच्यामध्ये अडकून पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला. त्यांना सेंट जॉर्ज इस्पितळात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलीप अहिवळे (51) असे त्या पोलीस कर्मचाऱयाचे नाव होते. ते डॉ. भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सोमवारी ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसमधील फलाट क्रमांक 10 वर इंद्रायणी एक्स्प्रेस पकडत असताना त्यांचा तोल गेला.
Comments are closed.