कोस्टल रोडवर भरधाव ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच, पाच महिन्यांत पाच हजार जणांना 95 लाखांच्या दंडाचा दणका

दक्षिण मुंबईतील रस्ते प्रवास सुसह्य करणाऱ्या कोस्टल रोडवर भरधाव ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच आहे. वाहतूक नियमांची जनजागृती करूनही वाहनचालकांना भरधाव ड्रायव्हिंगचा मोह आवरता आलेला नाही. मागील पाच महिन्यांत आरटीओने कारवाईची मोहीम तीव्र केली आणि विशेष व्हॅनमधील ‘स्पीडगन’सारख्या अद्ययावत उपकरणांचा वापर करून पाच हजार चालकांना 95 लाख रुपयांच्या दंडाचा दणका दिला.

मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि कोंडीमुक्त करण्यासाठी कोस्टल रोडचे काम करण्यात आले. हा प्रकल्प मुंबईकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ताशी 80 किमी वेग मर्यादा आखून दिलेली आहे. मात्र अनेक वाहनचालक ही वेगमर्यादा ओलांडून ताशी 100 ते 120 किमी वेगाने गाडय़ा चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. आता भरधाव ड्रायव्हिंगमुळे अपघातांचा धोका अधिक आहे. त्यामुळे भरधाव ड्रायव्हिंग करणाऱ्यांना ताळय़ावर आणण्यासाठी आरटीओने कारवाई तीव्र केली आहे. कोस्टल रोड मार्गाच्या दोन्ही दिशांना वडाळा आणि ताडदेव आरटीओची पथके तैनात ठेवली जात आहे. त्यांच्या माध्यमातून एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या अवधीत 4850 वाहन चालकांवर भरधाव ड्रायव्हिंग, लेन कटिंग, सीट बेल्ट परिधान न करणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे अशा विविध गुह्यांबद्दल कारवाई केली. त्यांना एकूण 94 लाख 85 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारवाईची ही मोहीम आणखी कठोर करणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाच महिन्यांतील  दंड आकारणी

एप्रिल    ः  25,97,000

मुख्य 18,23,000

जून: 23,40,500

जुलै      ः 17,a88,000

ऑगस्ट             ः 9,36,000

एकूण दंड          ः 94,84,500

Comments are closed.