काँग्रेस खासदार अकोइजाम यांना पोलिसांची नोटीस
‘जेएनयू’मधील लैंगिक छळप्रकरणी चौकशी होणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी जेएनयू लैंगिक छळप्रकरणी काँग्रेस खासदार अंगोमचा बिमोल अकोइजाम यांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीनुसार त्यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दिल्लीतील वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्याने त्यांच्या निवासस्थानाबाहेर नोटीस लावली आहे. जेएनयूच्या 11 विद्यार्थिनींनी अकोइजाम यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर जेएनयू प्रशासनाने अकोइजाम यांना तात्काळ प्रभावाने बडतर्फ केले आहे. ते मणिपूरच्या इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी आपल्यावरील आरोपांवर आणि तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी तपास अहवाल न दिल्याचा आणि गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
Comments are closed.