Police security in Kathegalli area remains


नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्य नगर भागातील वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अतिक्रमण शनिवारी (दि.२२) सकाळी हटविण्यात आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रविवारी (दि.२३) काठेगल्ली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला. शहरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून, काठेगल्ली परिसरातील रस्ते अद्यापही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. या परिसरात दोन्ही गटांना येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, या स्थळाविषयी न्यायालयात प्रकरण दाखल असून, ३ मार्च रोजी याबाबतची सुनावणी असल्याने त्याकडे दोन्ही गटांचे लक्ष लागून आहे. (Police security in Kathegalli area remains)

काठे गल्ली परिसरातील कॅमल हाउसला लागून असलेल्या सिडनी टॉवरशेजारील हजरत सय्यद सातपीर बाबा दर्ग्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे शनिवारी (दि. २२) दिसून आले. दर्गा अनधिकृत असल्याचा दावा करीत तो तत्काळ हटविण्याची मागणी केली होती. दुसरीकडे दर्गा ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांसह मुस्लिम संघटनांनी एकत्र येत दर्गा अधिकृत असून, वक्फ बोर्डाच्या मालकीचा असल्याचे सांगत कारवाईला विरोध केला होता. दोन्ही गट आमनेसामने आल्याने, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, अतिक्रमणाच्या कारवाईनंतर परिसरात तणावाचे वातावरण असल्याने व सोशल मीडियावर या विरोध मेसेज व्हायरल होत असल्याने रविवारी (दि.२३) देखील या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात करण्यात आला होता.



Source link

Comments are closed.