राजकीय पक्षांनी मीडिया संस्था सुरू करू नये
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांचे वक्तव्य : पत्रकारितेचे होते नुकसान
सर्कल संस्था/हैदराबाद
राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी प्रसारमाध्यम संस्था सुरू करू नये. राजकीय पक्ष माध्यम क्षेत्रात दाखल झाल्याने पत्रकारितेला नुकसान पोहोचते. प्रथम राजकीय पक्ष लोकांदरम्यान स्वत:च्या विचारसरणीला प्रसारित करण्यासाठी वृत्तपत्र सुरू करायचे, परंतु आता पक्ष स्वत:च्या त्रुटी लपविणे आणि इतरांना बदनाम करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर करत असल्याचा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी केला आहे. ते एका तेलगू वृत्तपत्राच्या वर्धापनदिन सोहळ्यात सामील झाले होते.
पक्ष स्वत:ची चुकीची कृत्यं लपविणे आणि विरोधात आवाज उठविणाऱ्या लोकांची प्रतिमा मलीन करण्यासाठी माध्यम संस्था सुरू करत आहेत. राजकीय नेता सहजपणे पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकार आहे का पत्रकाराच्या वेशातील राजकीय कार्यकर्ता आहे हे सहजपणे ओळखू शकतो असे मुख्यमंत्री रे•ाr यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले आहे.
तर मुख्यमंत्री रेड्डी यांनी सर्व पत्रकारांना राजकीय पक्षांपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला अहे. आज कुठलाही इसम ज्याला एक अक्षरही माहित नाही, तो पत्रकार असल्याचे म्हणत आहे, आम्ही चौकशी करताच तो आपण सोशल मीडिया जर्नलिस्ट असल्याचे सांगू लागतो असे रेड्डी यांनी नमूद केले आहे.
Comments are closed.