Bhiwandi Mayor Election : काँग्रेस चंद्रपुरातील बदला भिवंडीत घेणार? भाजपमधील फुटीचा काँग्रेसला लाभ?

पुढची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी आहे. भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने भाजपाचा गेम केलाय. भिवंडीत भाजपाचा नगरसेवकांचा एक गट फोडण्यात काँग्रेसला यश मिळालंय. आणि त्याच जोरावनर काँग्रेस सत्तास्थापनेच्या तयारीत आहे. 
चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असतानाही तिथे काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे आणि ठाकरे सेनेला फोडून भाजपाने सत्ता काबीज केली. आता अगदी अशीच परतफेड भिवंडीत करण्याचा काँग्रेसचा मानस दिसतोय.   भिवंडीत सुद्धा काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजे ३० नगरसेवक आहेत. आता भाजपचा एक गट फोडून भाजपच्याच ९ नगरसेवकांना काँग्रेसने सोबत घेत सत्तास्थापनेची तयारी केलीय. भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार नारायण चौधरी यांना आपल्याबाजूनं वळवण्यात कांग्रेसला यश आलंय. 
((काँग्रेसप्रणीत भिवंडी सेक्युलर फ्रंटला भाजपमधील ९ नगरसेवकांच्या फुटीर गटाची सोबत मिळतेय..पण भाजपाच्या एकत्रित गटनोंदणीनंतर ही फूट पडल्य़ाने भाजपा आता काय भूमिका घेणार किंवा कारवाी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ))

 

Comments are closed.