BJP Mumbai | भाजपची भेंडी बाजार ते क्रॉफर्ड मार्केटदरम्यान Tiranga Rally, मुस्लिम समाजाचा मोठा सहभाग

BJP Mumbai | भाजपची भेंडी बाजार ते क्रॉफर्ड मार्केटदरम्यान Tiranga Rally, मुस्लिम समाजाचा मोठी सहभाग
भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आज भेंडी बाजार ते क्रॉफर्ड मार्केटदरम्यान तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीत अल्पसंख्यांक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  हातात तिरंगा आणि मुखावर देशभक्तीचे घोष घेऊन निघालेल्या या रॅलीत सहभागी नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं. देशाच्या  केंद्र सरकारच्या धोरणांचे कौतुकही यावेळी करण्यात आलं.  राष्ट्रीय एकात्मता आणि एकजुटीचा संदेश देत ही रॅली शांततेत  काढण्यात आली याचा आढावा घेतल्या आपले प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी..

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या –

मान्सून महाराष्ट्रात दाखल, यंदा १२ दिवस आधीच एन्ट्री, बळीराजासाठी सर्वात मोठी आनंदवार्ता, मान्सूनला महाराष्ट्र व्यापण्यासाठी अनुकूल वातावरण
बारामतीत तुफान पाऊस…  पिंपळीत पाण्याच्या वेगामुळे नीरा डावा कालवा फुटला ….एनडीआरएफच्या २ टीम दौंड आणि बारामतीत दाखल …तर दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचं स्थलांतर…
मान्सून लवकर दाखल झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये… कृषी विभागाच्या सूचना… हवामानात बदल होण्याचा अंदाज
फरार असताना हगवणे पिता पुत्रानं वापरलेल्या तिन्ही गाड्या पोलिसांकडून जप्त, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नातेवाईकांची वाहनं वापरल्याचं उघड

Comments are closed.