BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!

तब्बल १५-२० दिवस वाट पाहायला लावल्यानंतर अखेर काल रात्री मुंबईत पावसाच्या सरी बरसल्या… रात्रभर मुक्काम केलेल्या पावसामुळे नेहमीप्रमाणे सखल भागांमध्ये पाणीही साठलं… पहिल्याच पावसानं मुंबईची गती कमी केलीच… मात्र महापालिकेच्या ढिसाळपणाचा नमुना दिसला, तो उघड्या मॅन होलमुळे… एबीपी माझानं याची पोलखोल केल्यानंतर महापालिकेला जाग आली अन् गटारांना झाकणं लावण्याचं काम हाती घेण्यात आलं… पण त्याआधी पालिका प्रशासनाची नाचक्की झालीच… नेमकं काय घडलं बघुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये…

आपलं कर्म असं परत येतं म्हणतात…

माटुंगा परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये चक्क मुंबई महापालिकेचाच एक अधिकारी पडला…

विशेष म्हणजे स्वतः महापौर रितू तावडे जलमय भागांची पाहणी करत असताना त्यांच्या समोरच हा प्रकार घडला…

((इथं आधी महापौर रिपोर्टरशी बोलत असताना दाखवून नंतर अधिकारी पडल्यापर्यंत व्हिज्युअल्स रिलीज करा))

या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसली, तरी महापालिकेची अब्रु मात्र पुरती खड्ड्यात घातली…

मुंबईत रात्रीपासून पावसानं दमदार हजेरी लावली अन् त्यात नालेसफाईचे दावेही वाहून गेले…

अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं…

पहाटे पाणी ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी झाकणं गायब असलेल्या मॅन होलनी मुंबईकरांना धडकी भरवली…

‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी कुर्ल्याच्या काजूपाडा परिसरातल्या उघड्या मॅन होलची पोलखोल केली…

Comments are closed.