‘औरंगजेबाची औलाद, देशद्रोही कृत्य..’ अधिवेशनात अबु आझमींच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, 2 वेळा कामकाज तहकुब, पहा
महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात अबू आझमींच्या ‘औरंगजेब उत्तम प्रशासक होता .. ‘या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला .

राष्ट्रद्रोही कृत्य,औरंगजेबाची औलाद,महापुरुषाचा अपमान म्हणत अबू आजमीनवर सडकून टीका झाली. या वक्तव्यावरून अधिवेशनात मोठी खडाजंगी झाली . गोंधळामुळे दोन वेळा सभागृह तहकूब झाले .

‘औरंगजेबाच्या असल्या औलादी रस्त्यावर नेऊन ठेचल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांकडे आमच्या धर्मात या म्हणून औरंगजेबाने भीक मागितली . पण माझ्या राजाने धर्मासाठी मरण पत्करले पण धर्म बदलला नाही .औरंगजेबाच्या असल्या औलादीला सभागृहात घ्यायला नाही पाहिजे’ असे महेश लांडगे म्हणाले

‘वंदे मातरम म्हणणार नाही असं मागे एमआयएमच्या आमदाराने म्हटलं होतं .हिंदुस्थानात राहायचं,मुलं पैदा करायची आणि औरंगजेबाची पुष्टी करायची ..अशांना या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही .औरंगजेबाची बढाई मारत असतील तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा .अबू आजमी वर कारवाई करायला हवी ही आमची मागणी आहे’ . -गुलाबराव पाटील

‘जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा होता . दारा शुकोहोला मारणारा .त्याचं उदातीकरण होऊ शकतं .आज निर्णय घ्यायला पाहिजे औरंग्याची तुटकी फुटकी कबर फोडण्याचा .जाने जिजिया कर लावला ,हिंदू महिलांवर अत्याचार केले त्याच्या संदर्भात आपल्या राजकारणासाठी खुर्चीसाठी असं वक्तव्य कोणी करत असेल तर समोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत .अध्यक्ष महोदय तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा .याद आनपट्ट्यांनी असा विचारांचे तुकडे करा’ . असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

‘त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे .पुन्हा या देशात कोणीही हिंमत करता कामा नये’ असे आक्रमकपणे मुनंटीवारांनी म्हटले.

यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

‘संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे औरंग्याचे गोडवे अबू आजमींनी गायले .अबू आजमी चा धिक्कार करतो .अबू आझमींनी यापूर्वीही चुकीचे वक्तव्य केलं होतं .धर्म न बदलता छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान दिलं . असं वक्तव्य करणारे अबू आजमी देशद्रोही आहेत .या देशद्रोह्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही .’असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले .’अबू आजमीन वर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली .यावेळी सभागृहात प्रचंड गदारोळ होत होता .

अबु आझमींना निलंबीत करा या मागणीसाठी आपापल्या खुर्च्यांवरून सारे नेते उठले होते. अबु आझमींच्या वक्तव्यानंतर मोठे पडसाद अधिवेशनात उमटले.

या गोंधळानंतर सभागृहाचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले.
येथे प्रकाशितः 04 मार्च 2025 03:17 पंतप्रधान (आयएसटी)
राजकारण फोटो गॅलरी
अधिक पाहा..
Comments are closed.