Rohit Pawar and Chhagan Bhujbal: अजितदादांना अमोल कोल्हेंना संयुक्त राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष करायचं होतं; रोहित पवारांच्या दाव्याची भुजबळांनी उडविली खिल्ली

Rohit Pawar and Chhagan Bhujbal: अजितदादांना अमोल कोल्हेंना संयुक्त राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष करायचं होतं; रोहित पवारांच्या दाव्याची भुजबळांनी उडविली खिल्ली

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर अजित पवार यांना संघटनेत अनेक बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच अमोल कोल्हे अनेक बैठकांमध्ये होते, या रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ उडाली होती. रोहित पवार यांच्या वक्तव्यावर आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ  यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एकप्रकारे रोहित पवार यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ते गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रोहित पवार म्हणतात त्यांच्यासोबत अजितदादांनी काही ठरवलं होतं. पण अजितदादांनी आम्हाला काही सांगितले नाही.  असं काही ठरलेलं हे आम्हाला माहिती नाही. आमच्या पुढे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काम हातात घेतले आहे, त्यांना पूर्णपणे सहकार्य करणे, हे आमचे कर्तव्य आहे. आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई आहेत, त्यांच्याशी बोलावे. नवीन उपमुख्यमंत्री आहेत त्या ठरवतील. विलीनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कोणत्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार ही ठरलं असेल. राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हेदेखील ठरले असेल. कोणी काही सांगितलं तर आपण त्याच्यावर काय बोलणार, अशी उपहासात्मक टिप्पणी छगन भुजबळ यांनी केली.

Comments are closed.