Devendra Fadnavis Birthday : देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम
राज्यात ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ गडचिरोलीतील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. गडचिरोली जिल्ह्यासाठी एक कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष्य असून, पहिल्या टप्प्यात चाळीस लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे. गडचिरोलीत विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आलं. यामध्ये चार पूर्णांक पाच एमटीपीए Steel Plant ची पायाभरणी, हेडरी ते कोनसरी Slurry Pipeline चं उद्घाटन, हेडरीतल्या Aryan Over आणि Grinding Unit चं उद्घाटन, कोंसर इथं Pellet Plant चं उद्घाटन, कोंसर इथं शंभर खाटांच्या रुग्णालयाचं भूमिपूजन, कोंसर इथं आधुनिक CBSE शाळेचं भूमिपूजन आणि सोनपल्ली इथं Lloyds Township चं भूमिपूजन यांचा समावेश आहे. तसेच, वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यामध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ वृक्ष लागवड मोहिमेलाही उपस्थिती होती.
Comments are closed.