Sharad Pawar – Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?

Sharad Pawar – Ajit Pawar : शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा विरोध असतानाही शरद पवारांनी त्यांची अदानींसोबतची मैत्री कधीही लपवलेली नाही… पवारांच्या याच मैत्रीचा प्रत्यय आज पुन्हा एकदा बारामतीत पाहायला मिळाला… शरद पवारांचे मित्र उद्योगपती गौतमी अदानी आज त्यांच्या पत्नीसह बारामतीत आले होते.. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीचं उद्घाटन अदानींच्या हस्ते पार पडलं.. अदानींच्या स्वागतासाठी पवार कुटुंबाने बारामतीत एकप्रकारे रेड कार्पेटचं टाकलं होतं…आज सकाळपासूनच पवार काका-पुतण्यांच्या २ जोड्यांसह संपूर्ण कुटुंब अदानींच्या स्वागतासाठी तयारीला लागलं होतं. सुरुवातीला रोहित पवार आणि अजित पवार या काका-पुतण्याने विमानतळावर अदानी आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत केलं.. त्यानंतर पुढे अदानी, अजित पवार एकाच गाडीने कार्यक्रमस्थळी रवाना झाले.. यावेळी गाडीचे सारथ्य स्वत: रोहित पवारांनी केलं… तर पुढच्या कार्यक्रमातही संपूर्ण पवार कुटुंब एकत्र उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी अदानींचं जोरदार कौतुक केलं

Comments are closed.