Independence Day Address | पाकिस्तानला Nuclear इशारा, 3.5 कोटी रोजगार, GST सुधारणांची घोषणा

स्वतंत्र दिनी, पंतप्रधानांनी पाकिस्तान आणि अमेरिकेला थेट इशारा दिला. अण्वस्त्रांच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही असे स्पष्ट केले. पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या Operation Sindoor चा उल्लेख करत, अनेक दशकांपासून चाललेले Nuclear ब्लॅकमेल आता सहन केले जाणार नाही असे सांगितले. अमेरिकेच्या Tariff ला स्वदेशीच्या नाऱ्याने प्रत्युत्तर दिले. आत्मनिर्भर भारत होण्यासाठी समृद्ध भारत हा नवा मंत्र दिला. एक लाख कोटी रुपयांच्या Viksit Bharat Rojgar योजनेची घोषणा केली, ज्यातून साडेतीन कोटी युवकांना रोजगार मिळणार आहे. आस्थापनांना संरक्षण देणारी Mission Sudarshan Chakra यंत्रणा आणणार असल्याची घोषणा केली. GST मध्ये सुधारणा करून वस्तूंवरचे Tax कमी करणार असल्याची मोठी घोषणा केली. येत्या दिवाळीमध्ये हा GST फेरआढावा घेण्यात येणार असून, Next Generation GST Reforms आणले जातील. Made in India Fighter Jets साठी Jet Engine भारतातच बनवण्याचे आवाहन केले. सहा Semiconductor Units जमिनीवर उतरत असून, चार नवीन Units ना Green Signal दिला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत Made in India Chips बाजारात येतील. पंतप्रधानांनी सांगितले, “न्यूक्लियर की धमकियों को अब हम सहने वाले नहीं है। न्यूक्लियर ब्लॅकमेल लंबे अरसे से चला आया। अब ब्लॅकमेल नहीं सहा जाएगा।”

Comments are closed.