Jitendra Awhad Rada : तासभर कार अडवली, पोलिसांनी आव्हाडांना फरफटत मागे खेचलं!
महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिविगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधान भवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला. त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीडवाजेपर्यंत विधान भवनात उमटले. जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्यामुळे आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्रीच विधान भवनाच्या गेटवर आंदोलन केलं. सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीपसमोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं. अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं. आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवारही उपस्थित होते. मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनीही निषेध केलाय.
Comments are closed.