Uddhav Thackeray Vs Eknath Shinde राणेंना भरल्या ताटावरून उठवलं ते काय?शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आल्याचा आरोप ठाकरेंनी केला. या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांचा जो माज दिसत आहे, त्याला राजकारण नव्हे तर सत्तेचं माजकारण म्हटले आहे. कुठे बॉक्सिंग, कुठे नवीन ‘चड्डी बनियान गँग’चे प्रताप, उघडलेले ‘खोके’ आणि विधीमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी या घटनांचा उल्लेख ठाकरेंनी केला. या घटनांमुळे महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागल्याचे ते म्हणाले. यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंनी सवाल केला, “राणेंना भरल्या ताटावरून उठवलं ते काय होतं?” सत्तेचा ताट गेल्यामुळे काही लोकं कासावीस झाले आहेत आणि आकांड तांडव करत आहेत, असेही शिंदे म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भरल्या ताटावरून कोणी उठवले, तेव्हा सत्तेचा माज दाखवला नाही का, असा प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला. सत्तेच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
Comments are closed.