Mahayuti Politics Sharad Pawar यांच्यावर टीका करताना विखे-पाटलांचा अजितदादांवर हल्लाबोल,महायुतीत वाद
महायुतीमधील वादाला भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी फोडणी दिली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना, ‘जाणत्या राजानं महाराष्ट्र उपाशी ठेवला’ असे म्हटले. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही ‘जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा’ अशा शब्दांत हल्लाबोल केला. साखर कारखान्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जात नाही, यावरून विखेपाटील अजित पवारांवर भडकले. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी यांनी इशारा दिला की, “आम्ही तोंड उघडलं तर त्यांचे मंत्रालयातले कारनामे बाहेर पडतील.” राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा धर्म विसरला नाही, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले. जितेंद्र आव्हाड यांनीही विखेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, चार-चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीवर अशी टीका करणे योग्य नाही. महायुतीतील या नव्या वादामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Comments are closed.