Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही

Malegaon News : मी टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचा दालनात फोटो लावल्याने त्यांचे महान कार्य अनेकांना कळाले. टिपू सुलतान यांच्या सैन्यातील अनेक प्रमुख हे ब्राह्मण होते. टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात आहे, हे भाजपला माहितच नाही. संविधानात ज्यांचा फोटो आहे तो हटविण्याचा अधिकार भाजप व इतरांना कोणी दिला? असा सावल करत मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद (Deputy Mayor Shan E Hind) यांनी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. (Tipu Sultan Photo Controversy)

Shan E Hind : मी ओबीसी वर्गातून आलीय म्हणून मला टार्गेट केलं जातंय

राज्यात गेल्या काही दिवसांपासून टिपू सुलतान (Tipu) प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मालेगाव महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच राजकीय वातावरण तापले आहे. महापौरपदी ‘इस्लाम’ पक्षाच्या नसीरिन बानो खालीद शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांची निवड झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान यांच्या छायाचित्रामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी टिपू सुलतानी तुलना शिवजी महाराजांशी करत, ते इंग्रजांविरुद्ध लढल्याची माहिती दिली. त्यावरुन, सत्ताधारी भाजपमधील नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं. सोबतच हे कृत्य करणाऱ्या शान-ए-हिंद यांच्यावरही टीका केली जातेय. या सर्व पार्शवभूमीवर आता, शान-ए-हिंद यांनी स्वतः प्रत्युत्तर देत भाष्य केलं आहे.

संविधानात टिपू सुलतान यांचा उल्लेख आहे. मग यांच्या विषयी आंदोलन करणाऱ्यांना परवानगी कशी मिळू शकते? असे म्हणत आज होणाऱ्या आंदोलनालाही शान-ए-हिंद यांनी टीका केली आहे. मी एक ओबीसी वर्गातून आलेली आहे म्हणून मला टार्गेट केले जात असल्याचा ‘शान ए हिंद ‘ यांनी आरोप केलाय.

Comments are closed.