Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उपोषण करण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे ठाम आहेत. भाजप नेते प्रसाद लाड यांनी गेल्या आठवड़्यात जरांगेंची भेट घेत मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. तर या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगेंनी २८ मे म्हणजेच आजच्या दिवसाची मुदत दिली होती. ही मुदत संपत असतानाच जरांगेंनी आपलं आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र केलीय. कडाक्याच्या उन्हात अन्नपाणी न घेता आणि चपलाही न घालता उपोषणाला बसण्याचा निर्धार त्यांनी केलाय. तर जरांगेंना उपोषणाची वेळ येणार नाही, या मतावर सत्ताधारी आजही ठाम आहेत. मनोज जरांगेंचं उपोषण सुरु होण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरलेत.मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंनी सरकारला २८ मे पर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत आज संपत असताना जरांगेंनी ३० तारखेपासूनचं आंदोलन टोकाचं करण्याचा निर्णय घेतलाय.बघूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
Comments are closed.