Zero Hour Protest आझाद मैदानात आंदोलकांची गर्दी तर मुख्यमंत्र्यांचं कर्तृत्वच काय? जरांगेंचा वार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उद्यापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच आज सकाळपासून मराठा आंदोलक आझाद मैदानामध्ये दाखल झाले. मैदानावर हळूहळू गर्दी जमू लागली असून, शेकडो मराठा समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदान न सोडण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. आज दुपारी मुंबईत पावसाची हजेरी लागल्याने मैदानात चिखल झाला, त्यावर खडी आणि वाळू टाकण्यात आली, तरीही मराठा कार्यकर्त्यांची गर्दी कायम होती. आंदोलकांची वाढती गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सेंट्रल रिझर्व्ह फोर्स आणि रॅपिड अॅक्शन फोर्स आझाद मैदान परिसरात तैनात करण्यात आली आहे. मराठा आंदोलन संयोजक विरेंद्र पवारांनी नऊ तासांसाठी परवानगी दिलेल्या जागेची पाहणी केली. मनोज जरांगे पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “मुख्यमंत्र्यांचं कर्तृत्वच काय आहे?” असा सवाल त्यांनी केला.
Comments are closed.