Silver Plates Controversy : तिजोरीत खडखडाट, जेवणाला चांदीचं ताट Special Report

विधान भवनात संसद आणि राज्य विधीमंडळ अंदाज समितीच्या दोन दिवसीय परिषदेत जेवणावळीसाठी चांदीच्या ताटांचा वापर केल्याचा आरोप. एका थाळीसाठी पाच हजार पन्नास रुपयांचा खर्च झाल्याचा दावा. सहाशे अतिथींसाठी तीस लाख तीस हजार रुपयांची उधळपट्टी झाल्याचे म्हटले जात आहे. विरोधकांनी या शाही सोहळ्यावर टीका केली आहे. विधीमंडळाने मात्र ताटं चांदीची नसल्याचे स्पष्टीकरण दिले असून खर्चही निम्म्याहून कमी असल्याचा दावा केला आहे. ‘नशीब सोन्याच्या चमचा नाही दिला’ अशी टीका एका वक्त्याने केली.

Comments are closed.