Avinash Jadhav Detained : मोर्चा निघणारच…अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, मनसे मोर्चावर ठाम

मनसेनी मोर्चा काढण्यापूर्वी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. वसई विरारमधील अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम निर्धार मनसेने केला आहे. आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. दरम्यान, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी या प्रतिबंधात्मक कारवाईवर टीका केली आहे. त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीवर नाराजी व्यक्त केली. “मराठी असणं आमचा गुन्हा आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या शहरात परप्रांतीयांचे अनेक मोर्चे निघाले, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही, असे त्यांनी नमूद केले. त्यांना कधी नोटीस दिली नाही किंवा त्यांच्या घरी पोलीस गेले नाहीत, असेही ते म्हणाले. मात्र, मनसेच्या अनेक सहकारी सल्लागारांना आणि सामान्य मराठी माणसांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. त्यांना घरून उचलून घेऊन गेले आहे. मराठी राज्यामध्ये मराठींसाठी आंदोलन करणे हे दुर्दैव आहे, असेही त्यांनी म्हटले. मनसेने निर्धार केला आहे की हा मोर्चा निघणारच. अविनाश जाधव आणि इतर मीरा भाईंदरमधील पदाधिकारी ताब्यात असले तरी मोर्चा काढणार असल्याचे मनसेच्या नेत्यांनी सांगितले. मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा मनसैनिकांचा निर्धार आहे. काही दिवसांपूर्वी एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण झाली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदरमध्ये मारहाणीच्या विरोधात मोर्चा काढला होता. यानंतर मराठी अस्मितेसाठी मनसेने मोर्चा काढण्याचे ठरवले. काल रात्री या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अनेक मनसे नेत्यांना नोटीस देण्यात आली होती. मीरा भाईंदरमध्ये एनएस बंदी घालण्यात आली होती. आज पहाटे साडेतीन वाजता अविनाश जाधव यांना काशिमिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत रवींद्र मोरे आणि इतर काही सहकारी देखील आहेत. मीरा भाईंदरमधील अनेक पदाधिकारी ताब्यात आहेत. मोर्चा निघू नये हा पोलिसांचा प्रयत्न आहे, मात्र आम्ही मोर्चा काढणारच हा मनसेचा निर्धार आहे.

Comments are closed.