Mohit Kamboj Coffee With Kaushik : तेजस ठाकरेंचे ‘ते’ व्हिडीओ, मलिकांशी वैर ते सिद्दिकी प्रकरण
मुंबई : 2019 मध्ये कोरोनाची साथ सुरु असल्याने कडक लॉकडाऊन सुरू होता. मात्र, अशा परिस्थितही उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे हॉटेलमध्ये गेल्याचे व्हिडीओ भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी पोस्ट केले होते. त्यावर आता कंबोज यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये (Coffee With Kaushik) स्पष्टीकरण दिलं. संजय राऊतांनी माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केल्यानं मी तेजस ठाकरेचे व्हिडीओ पोस्ट केले. ते ट्विट करू नये असं वाटत होतं, पण जशास तसं उत्तर देण्यासाठी हे व्हिडीओ पोस्ट केल्याचं कंबोज म्हणाले.
कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊतांबाबतही वक्तव्य केलं. संजय राऊत चुकून राजकारणात आले. त्यांच्यामध्ये सलीम-जावेदप्रमाणे स्क्रिप्ट लिहिण्याची ताकद आहे, असं म्हणत कंबोज यांनी खोचक टोला लगावला.
प्रश्न- भाजपमध्ये तुमचा काय रोल?
उत्तर- 2014 नंतर विकास आणि विश्वासाचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी सुरु केलं. मोदींनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न फडणवीस पूर्ण करत आहेत. मी 2012 साली पक्षात आलो, त्यावेळी मला दिंडोशीमधून उमेदवारी मिळाली, पण दुर्दैवानं पराभूत झालो. पण पक्षानं मला बाजूला सारलं नाही. मला नेहमी कामं दिली, जबाबदारी दिली. ते मी जबाबदारीनं पूर्ण करतो.
तुम्हाला फडणवीसांचा माणूस म्हणतात, त्यावर काय सांगाल?
उत्तर- मी फडणीसांना सगळ्याच भूमिकेत पाहिलंय. माझी लॉयल्टी पक्षाप्रती आहेच, पण फडणवीसांप्रतीही आहे. त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास पाहून मी स्वताला नशिबवान समजतो.
मविआने केलेले आरोपांचे काय?
उत्तर – 2019 साली उद्धव ठाकरेंचं सरकार असताना मविआनं केलेले कोणतेही आरोप सिद्ध झाले नाही. अमेरिकेतून ईव्हीएम हॅकिंगचा आरोपही खोटा आहे. मी त्यावेळी अमेरिकेत गेलो नव्हतो. सगळं नरेटिव्ह सेटिंग आहे. मला डीफोकस करण्यासाठी विरोधकांचं राजकारण आहे. त्यातच सकाळी 9 वाजता उठून बोलणारे पोपट तयार झाले. आता नवे काही जन्माला आलेत.
Comments are closed.