Mumbai Municipal Elections | ऑक्टोबरमध्ये अंतिम होणार मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना
मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना ऑक्टोबर महिन्यात अंतिम होणार आहे. प्रभाग रचना प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर झालं असून, या प्रक्रियेसाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल. नगरविकास विभागानं सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोणतीही सूट किंवा दिरंगाई न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवाळी २० ते २३ ऑक्टोबरदरम्यान असल्याने, निवडणुकीचे ‘फटाके’ दिवाळीनंतरच फुटणार हे निश्चित झाले आहे.
Comments are closed.