Nagpur Rain Red Alert : नागपुरात आज पावसाचा रेड अलर्ट, सर्व शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नागपूरच्या रामनगर परिसरातील हिल रोड ते पांढरा बोडीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज नागपूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या या पावसाच्या अलर्टमुळे नागपूर प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था बंद ठेवल्या आहेत. नागरिकांना आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.