Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण झालं. अजित पवारांच्या साथीने शरद पवारांनी भाजप सोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं. असं भाकीत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडेकरांनी केलंय. शरद पवार जे बोलतात, त्या उलट कृती करतात, हे त्यांच्याबद्दलचं माझं मापदंड अगदी तंतोतंत खरं ठरलं. त्यामुळं लवकरचं सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर  सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये, असं आंबेडकर म्हणालेत. तसंच काँग्रेसने आता निर्णय घेण्याची वेळ आलीये. ठाकरे शिवसेनेच्या पोटात राज ठाकरे आहेत. त्यामुळं राज ठाकरे ज्या-ज्या पक्षांसोबत युती करणार असेल त्या पक्षांसोबत काँग्रेसने जाऊ नये. काँग्रेसने हे पाळलं नाही तर महाराष्ट्राप्रमाणे देशभरात त्यांचं अस्तित्व कमी होईल. असा इशारा ही आंबेडकरांनी थेट काँग्रेसला दिला. मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केलीये. इतर महापालिकांमध्ये ही भाजप वगळता इतर पक्षांशी आघाडी करण्याचं सुरुये. जिथं बोलणी फिस्कटेल तिथं आम्ही स्वबळावर लढू, असं आंबेडकरांनी जाहीर केलं. त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी

आजच्या इतर बातम्या – 29 DEC 2025

मंत्री, आमदार, खासदारांच्या नातेवाईकांना पालिका निवडणुकीत उमेदवारी नाही… भाजपाचा मोठा निर्णय.. निर्णयांनंतर कृष्णराज महाडिक, अजिंक्य फरांदे आणि रश्मी बेंडाळे-हिरे यांची निवडणुकीतून माघार
पिंपरी-चिंचवडपाठोपाठ पुण्यातही शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणुका लढणार, रोहित पवारांची घोषणा..पवार एकत्र आले त्यापेक्षा कार्यकर्ते एकत्र आले असं म्हणा, रोहित पवारांची प्रतिक्रिया…
पुण्यात भाजप-शिवसेना युतीची शक्यता मावळली…एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव…भाजपकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे शिवसेना नाराज…
पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी..सचिन अहिर, सतेज पाटलांकडून आघाडीची घोषणा तर दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर निशाणा
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…तिकीट वाटपाच्या घोळामुळे शहराध्यक्ष राखी जाधवांचा भाजपमध्ये प्रवेश.. वॉर्ड क्रमांक १३१मधून उमेदवारी जाहीर तर राखी जाधवांच्या प्रवेशावर प्रकाश मेहतांची उघड नाराजी

Comments are closed.