Nilesh Rane : गरिबांविरोधात असा पैसा वापरत असेल तर जिंकणार कसे? निलेश राणे ‘एबीपी माझा’वर

Nilesh Rane : गरिबांविरोधात असा पैसा वापरत असेल तर जिंकणार कसे? निलेश राणे ‘एबीपी माझा’वर
मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटले, राणेंचा आरोप  राणेंची निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट
मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप काल निलेश राणेंनी केला…इन्स्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे दिले जात असल्याचा आरोप केला.. मालवण शहरातील भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात पैशांची बॅग सापडल्याचा लाईव्ह व्हिडीओ त्यांना केला.. यानंतर आज निलेश राणेंनी मालवण नगरपरिषदेत निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन कालच्या प्रकरणावर काय कारवाई केली याचा आढावा घेतला…त्यानंतर राणे पीआय जगताप यांना भेटायला मालवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले..

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 27 NOV 2025
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत ठाकरे बंधूंचं ठरलं असल्याची चर्चा… शिवतीर्थवर ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती…. उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये दीड तास मंथन…
मालवण निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटपाच्या आरोपांवर निलेश राणेे ठाम…रोज वाटण्यासाठी  ५० लाखांपेक्षा जास्त पैसे येत असल्याचा दावा…राणेंकडून निवडणूक आधिकाऱ्यांशी चर्चा करत कारवाईची मागणी
हमाम मे सब नंगे… जो नियम आम्हाला तोच सर्वांना नितेश राणेंचा निलेश राणेंवर पलटवार…नितेश राणे किनवडेकरांच्या घरी भेटीला
काँग्रेस नको म्हणून छाती बडवणारे एकनाथ शिंदे सोनिया आणि राहुल गांधींसोबत उमरग्यामध्ये एकाच बॅनरवर, अंबादास दानवेंचा आसूड,  तर परभव दिसत असल्यानं दानवे टीका करततात शिंदेंच्या शिवसेनेचा पलटवार
संतोष बांगर यांनी सत्तांतराच्या काळात ५० खोके घेतले ही सत्य गोष्ट… भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा गंभीर आरोप…

Comments are closed.