Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात सुरू असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते खासदार पार्थ पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक ते दीड तास प्रदीर्घ चर्चा झाली असून, या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या भेटीला विशेष महत्त्व का?
पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून त्यामागे अनेक महत्त्वाचे राजकीय संदर्भ असल्याचे बोलले जात आहे.
अध्यक्षपदाचा वाद आणि राज ठाकरेंची भूमिका:
काही दिवसांपूर्वी पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष होतील असे संकेत दिले होते. त्यावर राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली होती. “मराठी पक्षाचा अध्यक्ष ‘पाटील’ असावा, ‘पटेल’ नसावा,” असे रोखठोक विधान त्यांनी केले होते. या टीकेनंतर राजकीय वातावरण तापले आणि अखेर प्रफुल्ल पटेल यांच्याऐवजी सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली. राज ठाकरेंच्या भूमिकेचा हा मोठा परिणाम मानला जात आहे.
अजित पवार अपघात प्रकरण:
अजित पवार यांच्याशी संबंधित अपघात प्रकरणावरून सध्या विरोधक आक्रमक आहेत. रोहित पवार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणात मराठी माणसाच्या हितासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी या प्रकरणावर भूमिका मांडत सरकारवर निशाणा साधला होता. “या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित होत नाहीये,” अशी टीका त्यांनी केली होती.
Comments are closed.