Pimpri Chinchwad NCP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
कोल्हापूर नंतर पिंपरी चिंचवडमध्ये ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरचं शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर 128 जागांपैकी कोणत्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? कोण मोठा आणि कोण छोटा भाऊ असणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना सोबत घेणार का? या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षासोबत संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.
– 2017 साली 128 पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 नगरसेवक निवडून आले होते.
– राष्ट्रवादीत फूट पडल्यावर 2 नगरसेवक शरद पवारांसोबत राहिले.
– तर अजित पवारांना 34 नगरसेवकांनी पाठिंबा दिला
– विधानसभेवेळी मात्र अजित पवारांच्या गटातील भोसरीचे नेते अजित गव्हाणेंनी 16 माजी नगरसेवकांसह आणि चिंचवड मध्ये शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी तुतारी फुंकली.
– आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भोसरीत अजित गव्हाणे समर्थकांसह पुन्हा स्वगृही परतले
– तर राहुल कलाटे सध्या भाजपमध्ये चाचपणी करत असल्याचं बोललं जातंय.
– हे पाहता सध्या अजित पवार गटाचे पाठबळ जास्त असल्याचं दिसून येतंय.
– त्यामुळं वयाने, मानाने मोठे असलेल्या शरद पवारांना मोठा भाऊ मानायला अजित पवार गट तयार आहे.
– परंतु ताकद जास्त असल्यानं जागावाटपात अजित पवार मोठे भाऊ मानले जातील, असं बहल म्हणतायेत.
Comments are closed.