PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

नरेंद्र मोदींचे राष्ट्राला उद्देशून भाषण : काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी नारीशक्ती वंदन विधेयकाला (Nari Shakti Vandan Bill) विरोध करत महिलांच्या अधिकारांचे भ्रूणहत्या केली. ज्या ज्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणामध्ये अडथळे आणले त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Speech) यांनी दिला. या पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध करत त्यांचा खरा चेहरा समोर आणला असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना संंबंधित 131 वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत आपली भूमिका मांडली. काँग्रेसने इतिहास रचण्याची आणि महिलांच्या बाजूने उभे राहण्याची संधी गमावली असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, “आज भलेही हे विधेयक पास करण्यासाठी 60 टक्के बहुमत आमच्याकडे नसेल, परंतु देशातील कोट्यवधी महिलांची आम्हाला साथ आहे. महिलांच्या अधिकारांमध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी आम्ही दूर करू. आमचा विश्वास दृढ आहे. आम्ही फक्त त्या वेळेची वाट पाहतोय. काल आमच्याकडे संख्याबळ नाही म्हणजे आमचा पराभव झाला असं नाही. आमचा प्रयत्न थांबणार नाही. आमच्याकडे पुढे अनेक संधी येतील आणि आम्ही हा संकल्प पूर्ण करूच.”

Comments are closed.