Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर ‘आप’ने कारवाई का केली?

मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना, मैं वो दरिया हूं जो वक्त आने पर सैलाब बनता हूं, ही शायरी पोस्ट केलीये. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी… सध्या आम आदमी पार्टी आणि राघव चड्ढा यांच्यात सध्या काहीतरी बिनसल्याचं चित्र दिसतंय. कारण पक्षाने राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या ‘डेप्युटी लीडर’ पदावरून हटवण्याची विनंती सचिवालयाला केलीये. पण आता राघव चड्ढा यांनीही शांत न राहता, थेट इशारा दिलाय. माझा आवाज दाबलाय, पण मी हारलो नाही, अशी प्रतिक्रिया राघव चड्ढा यांनी दिलीये…

एक व्हिडिओ शेअर करत राघव चड्ढा यांनी काही तिखट सवाल उपस्थित केले आहेत.

संसदेत जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का?

माझ्या बोलण्यावर बंदी घालण्यासाठी ‘आप’ने संसदेला पत्र का लिहिलं?

जनतेच्या प्रश्नांमुळे सामान्य माणसाचा फायदा झाला, मग पक्षाचं काय नुकसान झालं?

आता प्रश्न पडतोय की ज्या पक्षाचे ते खासदार आहेत त्याच पक्षाने त्यांच्यावर अशी अॅक्शन का घेतली?

मिळालेल्या माहितीनुसार, राघव चड्ढा संसदेत एअरपोर्टवरील महागडा चहा, डिलिव्हरी बॉईजचे प्रश्न, मोबाईल रिचार्ज यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरून चर्चेत आले होते. पण सूत्रांच्या मते, ते कोणत्या विषयावर बोलणार आहेत, याची पूर्वकल्पना ते पक्षाला देत नव्हते. यामुळेच पक्षाने त्यांच्या बोलण्याच्या अधिकारावर आणि वेळेवर कपात करण्याची मागणी केली आहे.

एक काळ असा होता जेव्हा राघव चड्ढा हे अरविंद केजरीवाल यांचे सर्वात विश्वासू मानले जात होते. मग आता अचानक पक्षाने त्यांच्यावर ही कारवाई का केली? राघव चड्ढा यांचा पुढचा पवित्रा काय असेल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा

Comments are closed.